दाबोळीत १८ लाखांचे सोने जप्त

दुबईहून आलेल्या महिलेला घेतले ताब्यात

12th February 2019, 06:46 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता

वास्को : दुबईहून एअर इंडियाच्या विमानाने दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एका महिलेकडून अबकारी अधिकाऱ्यांनी सुमारे १८ लाख ८ हजार ८४० रुपये किंमतीचे सोने हस्तगत केले. हे सोने लगाद्याच्या स्वरूपात होते. हस्तगत केलेल्या सोन्याचे वजन ५९० ग्रॅम आहे. याप्रकरणी पुढील तपास चालू आहे.

संशयित महिला एअर इंडियाच्या ९९५ विमानातून दुबईहून गोव्यात आली होती. या महिलेची हालचाल संशयास्पद वाटल्याने अबकारी अधिकाऱ्यांनी ‌तिची झडती घेतली. यावेळी तिने जीन्स् पँटमध्ये लगद्याच्या स्वरूपात सोने लपवून आणल्याचे उघडीस आले. या महिलेने सोन्याचा लगदा तयार करून तो कमरपट्ट्याच्या आकाराच्या एका लांबट पॉलिथिन पिशवीमध्ये भरला. ही लगदा भरलेली पिशवी तिने पँटचा कमरपट्ट्याच्या भागात अतिशय खुबीने लपवली होती. पण ही चलाखी अबकारी अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे फोल झाली. ‘अबकारी कायदा १९६२’अंतर्गत संशयित महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. 

अबकारी विभागाचे आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त डॉ. राघेवेंद्र पी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत २३६.५ लाख रुपयांचे सोने तसेच ६७.५ लाखांचे विदेशी चलन तस्करी करताना पकडले आहे.

Top News

परप्रांतातून आलेल्यांकडून राज्याला धोका

मुख्यमंत्री डॉ. सावंत; कोविड रुग्णांच्या उपचारासाठी यंत्रणा सज्ज Read more

महिला गृहरक्षकांचे रोजंदारी वेतन कापले

लॉकडाऊनमध्ये कामावर गैरहजर राहिल्याचा फटका Read more

अव्वल कारकून भरतीच्या चमत्कारांची चर्चा

उपसभापतींच्या पुत्राचे पदवी प्रमाणपत्र बोगस Read more

‘लॉकडाऊन’च्या चौथ्या टप्प्यात आर्थिक उपक्रमांत आणखी शिथिलता

मुख्यमंत्र्यांची माहिती; सामाजिक अंतराचे प्रामाणिकपणे पालन करण्याचेही आवाहन Read more

दोन विशेष रेल्वेतून ३१८ प्रवासी मडगावात दाखल

दिल्लीतून २८२, तिरुअनंतपुरम येथील ३६ जण गोव्यात Read more