गोव्यातील खनिजावरील निर्यात कर हटवा

मुख्यमंत्र्यांची केंद्रीय खाण मंत्र्यांकडे मागणी


19th January 2018, 07:11 pm

विशेष प्रतिनिधी - गोवन वार्ता

पणजी : गोव्यातील खनिज देशातील स्टील कंपन्यांना उपयोगाचेनाही. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी दुप्पट खर्च आहे पण हेच खनिज चीन सारख्या देशातनिर्यात केल्यास त्यात देशाचा फायदा आहे. त्यामुळे गोव्यातील खनिजावरील निर्यात करकमी करावा अशी मागणी मी केंद्रीय खाण मंत्र्यांकडे केली आहे असे मुख्यमंत्री मनोहरपर्रीकर यांनी शुक्रवारी सांगितले.

सध्या उच्च दर्जाच्या खनिजावर निर्यात कर मोठ्या प्रमाणातआहे. विदेशातून उच्च प्रतीच्या खनिजालाही मागणी आहे पण निर्यात करामुळे ते परवडतनाही. याचाच परिणाम म्हणून गेल्या तीन महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळातल्यातुलनेत निर्यातही कमी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकार आणि खाणकंपन्यांनी खनिज निर्यात कर कपातीची मागणी लावून धरली आहे. आज केंद्रीय खाण मंत्रीनरेंद्र सिंग तोमर हे राज्यांच्या खाण मंत्र्यांच्या बैठकीसाठी गोव्यात आले होते.या भेटीत पर्रीकर यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे खनिज निर्यात कर कमी करण्यासाठीप्रयत्न करण्याची मागणी केली.

केंद्रीय वित्त मंत्रालय, वाणिज्य आणि खाण अशी तीनमंत्रालये निर्यात कर कपातीच्या प्रक्रियेत समाविष्ट आहेत त्यामुळे केंद्रीय खाणमंत्र्यांनी प्रयत्न करून येत्या अर्थसंकल्पात निर्यात कर कपात होईल यासाठीप्रयत्न करावेत अशी मागणी गोव्याने केल्याची माहिती सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदिली.

५८ ग्रेडपेक्षा कमी असलेल्या खनिजांवर निर्यात करयापूर्वी प्रत्येकी १० आणि ३० टक्क्यांवरून कपात केली आहे. पण ५८ ग्रेड व त्यावरीलग्रेडच्या खनिजावर सध्या ३० टक्के असलेला निर्यात करार कमी करावा अशी मागणी केलीआहे.