म्हादईप्रश्नी राज्याकडून हस्तक्षेप अर्ज दाखल

पुराव्यासह १०३ पानी अंतर्वादिक अर्ज म्हादई पाणी तंटा लवादासमोर सादर


19th January 2018, 07:00 pm
म्हादईप्रश्नी राज्याकडून हस्तक्षेप अर्ज दाखल

विशेष प्रतिनिधी - गोवन वार्ता

पणजी: काम बंद ठेवण्याचा आदेश असतानाही म्हादईच्या कळसानदीचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकने सुरू केलेल्या कामाच्या पुराव्यासह १०३ पानांचाहस्तक्षेप अर्ज शुक्रावरी गोव्याने म्हादई पाणीतंटा लवादासमोर सादर केला आहे.

दोन दिवसांपूर्वी गोव्याच्या जलस्त्रोत खात्याचे अधिकारीदिल्लीत गेले होते. अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांच्याशी चर्चाकरून सरकारने आज १०३ पानांचे इंटरलोक्युटरी ऍप्लिकेशन लवादासमोर सादर केले. लवादम्हादईप्रकरणी ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेणार आहे. या सुनावणीवेळी कर्नाटकला नवेनिर्देश लवाद जारी करण्याची शक्यता आहे.

कर्नाटकने खानापूर तालुक्यातील म्हादईच्या कळसा या उपनदीचेपाणी वळविण्याचे बंद असलेले काम सुरू केले होते. गोव्याने त्याची गंभीर दखल घेतकाम सुरू असलेल्या ठिकाणी निरीक्षण करून काम सुरू असल्याचे पुरावे जमा केले.जलस्त्रोत मंत्री विनोद पालयकेर यांनीही कळसा नदीवरील कामाची पाहणी केली होती.शेवटी आज याविषयी हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला.

कर्नाटकने म्हादईच्या कळसा आणि भांडुरा या उपनद्यांचे पाणीवळवून ते मलप्रभा नदीत नेण्यासाठी योजना काही वर्षांपूर्वी सुरू केली आहे. नदीचास्त्रोत वळविण्याच्या या कृतीची गंभीर देखल घेत गोव्याने कर्नाटकला पाणीवळविण्यापासून रोखावे यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली होती. शेवटी केंद्रानेम्हादई जल तंटा लवाद स्थापन करून हा विषय लवादाकडे सोपवला.

दरम्यान, म्हादई बचाव अभियानने याप्रकरणी एक याचिका सर्वोच्चन्यायालयात सादर केली होती तिथे ऑगस्टमध्ये न्यायालयाने कळसावर सुरू असलेले कामबंद करावे असा आदेश कर्नाटकला दिला होता. लवादानेही तसे निर्देश दिले होतेत्यामुळे काही दिवस काम बंद करण्यात आले होते. पण गेल्या काही दिवसांपासून कळसानदीचे पाणी वळविण्याच्या जागी कर्नाटकने दिवस रात्र काम सुरू केले होते. ही बाबराज्य सरकारच्या निदर्शनास येताच सरकारने त्याविषयी पुरावे जमा करून शुक्रवारी लवादासमोर हस्तक्षेप अर्ज दाखल केला.