आमोनियाने उडवली वास्कोवासीयांची झोप

चिखली येथे मध्यरात्री टँकर उलटला, दोन महिलांना इस्पितळात हालवले


19th January 2018, 10:44 am
आमोनियाने उडवली वास्कोवासीयांची झोप

प्रतिनिधी|गोवन वार्ता

वास्कोः अत्यंत घातक असे ओमोनिया रसायन घेऊन जाणारा टँकर चिखली वास्को येथील सागमैदानाजवळ कलंडल्याने वास्कोवासीयांसह साऱ्या यंत्रणेची झोप उडाली. आमोनिया गळतीमुळेजवळच्याच घरातील दोघा महिलांना श्वास घेणे कठीण बनल्याने त्यांना तातडीने चिखलीकुटीर रुग्णालयात व नंतर जवळच्याच खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तर, खबरदारीचाउपाय म्हणून चिखली परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले. या भागातीलशाळांनाही सुटी देण्यात आली होती.

एमपीटी बंदरातून आमोनिया टँकर दाबोळीच्या दिशेने जात असताना रात्री २.४५ च्यासुमारास हा प्रकार घडला. टँकरचालकाने दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेलाउभ्या असलेल्या ट्रकांआडून एक वाहन अचानक रस्त्यावर आल्याने त्याचा टँकरवरील ताबासुटला. टँकरची धडक रस्ता दुभाजकाला तसेच वीज खांबाला बसली व तो डाव्या बाजूनेकलंडला. यावेळी आमोनिया गळती सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच एमपीटी, झुआरीआस्थापनांच्या अधिकाऱ्यांसह पोलिस, अग्निशामक दल तसेच आपत्कालीन यंत्रणेनेघटनास्थळी दाखल होऊन आवश्यक उपाययोजना तसेच टँकरवर पाण्याचा फवारा सुरू केला.खबरदारीचा उपाय म्हणून दाबोळी विमानतळ ते चिखली दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंदकरण्यात आला होता. अथक प्रयत्नांतर सकाळी ८.४५ पर्यंत स्थिती नियंत्रणात आली.यानंतर टँकर उभा करून गळतीच्या ठिकाणी सील बसवण्यात आले.  

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे समचालक अशोक मेनन, दक्षिण गोवा पोलिसअधीक्षक अरविंद गावस, वाहतूक अधीक्षक दिनराज गोवेकर, अतिरिक्त (दक्षिण)जिल्हाधिकारी आग्नलो फर्नांडिस आदींनी घटनास्थळी दाखल होऊन मार्गदर्शन केले. पणजी,मडगाव, वेर्णा, वास्को येथील अग्निशामक दलाचे बंब तसेच एमपीटी व झुआरीच्यावाहनांचा यावेळी वापर करण्यात आला.

दरम्यान, क्रेनच्या साह्याने टँकर उभा करतेवेळी पुन्हा एकदा गळती सुरूझाल्याने यंत्रणा पुन्हा सतर्क झाली होती.