म्हापसा येथील हॉटेलात ट्रक चालक मृतावस्थेत


19th January 2018, 03:06 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

म्हापसा : येथील एका हॉटेलमधील खोलीच्या स्नानगृहात कंटेश सेंटप्पा (३५, बिजापूर व सध्या कांदोळीत) हा इसम मृतावस्थेत सापडला. कंटेश हा ट्रक चालक होता.      

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १८ रोजी सांय. ३.३० वा. घडली. कंटेश हा कांदोळीहून म्हापशात सकाळी खरेदीसाठी आला होता. त्यानंतर सकाळी ११ वा. त्याने त्या हॉटेलची खोली आरक्षित केली व खोलीत राहायला गेला. सांयकाळी कंटेश हा खोलीतील स्नानगृहात पडल्याचे दिसून येताच हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना माहिती दिली.       पोलिस उपनिरीक्षक किरण नाईक यांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिला 

आहे.