‘लोकविश्वास’च्या स्टॉलचे उद्घाटन


13th January 2018, 02:25 am
प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : लोकविश्वास प्रतिष्ठान, ढवळी या संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या ढवळी, काणकोण, केपे, होंडा आणि मोले येथील शाळांतील मुलांनी बनविलेल्या वस्तू लोकोत्सवात विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत. या स्टॉलचे उद्घाटन गोवा इंटरप्रीनर्स मॉनेटरिंग सर्व्हिसेसचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कला अकादमी-दर्या संगम येथील लोकोत्सवातील स्टॉलच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव राज वैद्य, खजिनदार मेहबूब विराणी, सदस्य सागर साकोर्डेकर, ए. पी. सूर्यवंशी, ढवळी येथील शाळेचे मुख्याध्यापक अरविंद मोरे आणि संस्था सदस्य उपस्थित
होते. लोकोत्सवाच्या निमित्ताने विशेष मुलांच्या अंगभूत असलेल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी हा स्टॉल लावण्यात आला आहे. या मुलांनी बनविलेेल्या मातीच्या मूर्ती, अगरबत्ती, टेरिकोट आणि वुलनच्या वस्तू, कागदी पिशव्या आणि फुले, फुलदाण्या, कापडावरील नक्षीकाम, भित्तीचित्रे, दागिने आदी वस्तू प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
लोकोत्सवाच्या निमित्ताने विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.