गृह आधार, लाडली लक्ष्मी, ममतासाठी आधार सक्तीचे

13th January 2018, 02:25 Hrs
विशेष प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : गृह आधार, लाडली लक्ष्मी आणि ममता योजनेसाठी आधारकार्ड हा प्रमाणीकरणाचा पुरावा मानला जाईल. त्यासाठी हवी असलेली दुरुस्ती महिला आणि बाल कल्याण खात्याने केली आहे.
गोवा आधार वित्तीय आणि अनुदान सेवा लाभ कायदा २०१७ च्या कलम ४ प्रमाणे या तिन्ही योजनांच्या प्रमाणीकरणासाठी आधार क्रमांक सक्तीचा असेल.
गृहिणींसाठी असलेल्या गृह आधार योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या १.५२ लाख झाली आहे. या योजनेसाठी दरवर्षी लाभार्थ्याने हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो. आता सर्वांना आधार क्रमांक देणे सक्तीचे झाले आहे.
लाडली लक्ष्मी योजनेतून लाभ घेणाऱ्यांची संख्या सुमारे ५० हजारपर्यंत आहे. यापुढे आपल्या अर्जासोबत उमेदवाराने आधारकार्ड जोडणे सक्तीचे आहे. २०१२ मध्ये सुरू केलेल्या या योजनेसाठी सुमारे ६० हजार अर्ज आले होते. मुलगी झाल्यानंतर खात्यातर्फे ममता योजनेतून आर्थिक मदत केली जाते. त्यासाठीही यापुढे आधार कार्ड सक्तीचे केले आहे.
२०१२ मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गृहिणींना मदत म्हणून गृह आधार योजना मार्गी लावली होती. त्यावेळी १ हजार रुपये महिन्याला मानधन दिले जायचे. त्यानंतर २०१४ पासून मानधन १,२०० रुपये केले गेले. २०१६ पासून १,५०० रुपये मानधन केले गेले. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १.५२ लाख झाली आहे.

Top News

गोव्यातील खाणींचा लिलाव न्यायालयाच्या निकालावर अवलंबून

विविध राज्यांतील सुमारे १०० खाणपट्ट्यांचे भूगर्भ सर्वेक्षण सुरू, खाणमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची माहिती Read more

गोव्यातील खनिजावरील निर्यात कर हटवा

मुख्यमंत्र्यांची केंद्रीय खाण मंत्र्यांकडे मागणी Read more

म्हादईप्रश्नी राज्याकडून हस्तक्षेप अर्ज दाखल

पुराव्यासह १०३ पानी अंतर्वादिक अर्ज म्हादई पाणी तंटा लवादासमोर सादर Read more

आमोनियाने उडवली वास्कोवासीयांची झोप

चिखली येथे मध्यरात्री टँकर उलटला, दोन महिलांना इस्पितळात हालवले Read more

काजीभाटमध्ये पाईपलाईनलाही विरोध

स्थानिकांकडून मशीनसमोरच ठाण; सुदिन ढवळीकरांविरोधात घोषणा Read more