वजन, मापे खात्याकडून ३.८ लाखांचा माल हस्तगत


12th January 2018, 03:48 am
प्रतिनिधी | गोवन वार्ता
म्हापसा : म्हापसा व हडफडे येथील वेगवेगळ्या आस्थांपनांवर वजन व मापे खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापे मारून सुमारे ३ लाख ८० हजारांचा माल हस्तगत केला.
या कारवाईध्ये पाकीट बंद माल, दोन पेग, पाच पाकिटे वेगवेगळ्या कंपनींचा आरोग्यादायी पावडर व गोळ्या, सात बॉक्स लिनोवा लॅपटॉप असे वजने व मापे कायद्याखाली गुन्हेे नोंदविण्यात आले व हा सर्व माल हस्तगत करण्यात आला.
आरोग्यदायी मालावर वितरकाचा नाव व पत्ता, तसेच किंमत नमूद करण्यात आली नव्हती. लिनोवा लॅपटॉपच्या बॉक्सवर माल खरेदीची तारीख नमूद करण्यात आली नव्हती, तर दोन दारूच्या आस्थापनांतील पेगची मापे योग्य नसल्याचे आढळून आल्याने ते पेग जप्त करण्यात आले.
खात्याचे नियंत्रक के. बी. कोसंबी, सहाय्यक नियंत्रक प्रकाश शिरोडकर, निरीक्षक गुलाम गुलबर्ग, नितीन पुरुषण व कर्मचारी जी. ए. गावस, डी. व्ही. शेट व गुरुनाथ नाईक यांनी ही कारवाई
केली.