राष्ट्रपती कोविंद फेब्रुवारीमध्ये गोव्यात

12th January 2018, 03:46 Hrs
विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : गोवा विद्यापीठाचा ३० वा पदवीदान समारंभ फेब्रुवारी महिन्यात होणार असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी दिल्ली भेटीत राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना पदवीदान समारंभाचे आमंत्रण दिले.
६ ते १० जानेवारी दरम्यान राज्यपालांनी दिल्लीत राष्ट्रपती कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राज्यपालांनी गोव्यात सुरू केलेल्या वेगवेगळ्या प्रशासकीय आणि सामाजिक उपक्रमांबद्दल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे कौतुक केले. कुंभार काम, मधमाशी पालन, चरखा असे विविध उपक्रम राजभवन, आदिवासी भाग, तुरूंग आदी क्षेत्रांत राबविल्यामुळे मोदींनीही आनंद व्यक्त केला. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडून खादी क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या नव्या योजनांची माहिती करून घ्या, असे मोदींनी सिन्हा यांना सूचविले.

Related news

कार्निव्हल पर्यटन वाढीसाठी वरदान

मंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन : अन्न व संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन Read more

साखळीत उद्या भव्य कोकणी भजन स्पर्धा

रवींद्र भवन येथे अायोजन : स्वागताध्यक्षपदी सभापती डाॅ. प्रमोद सावंत Read more