गुण पद्धत योजनेत १,१६७ पहारेकऱ्यांची नोंदणी

Story: विशेष गुण पद्धत योजनेत | 03rd January 2018, 03:05 Hrs

प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : राज्यातील वाहतुकीत शिस्त यावी, यासाठी पोलिस खात्याने सुरू केलेल्या विशेष गुण पद्धत योजनेत ‘पहारेकरी' नागरिकांचा सहभाग वाढत आहे. योजनेअंतर्गत १० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत १,१६७ नागरिकांनी पहारेकरी म्हणून योजने अंतर्गत नोंदणी केली आहे.
पोलिस खात्याने १० नोव्हेंबर रोजी विशेष गुण पद्धत योजना सुरू केली आणि त्यात नागरिकांनाच ‘पहारेकरी' बनविण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती व्हॉट्सअॅपद्वारे पोलिसांना देणाऱ्यांना नियम उल्लंघनाच्या प्रकारावरून विशेष गुण देण्यात येत आहे.
दरम्यान, १० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत नोंदणी केलेल्यांनी वाहतूक नियम उल्लंघनाबाबतची ५,२८१ वाहन चालकांना वाहतूक नियम उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीसही जारी केली आहे. या योजने अंतर्गत नागरिकांना आपले नाव, पत्ता, ई-मेल व इतर माहिती देऊन नोंदणी करावी लागते. त्यानंतर पोलिस खाते त्यांना युनिक नोंदणी क्रमांक देईल. त्या क्रमांकाचा वापर करून नागरिकांना वाहतूक नियम उल्लंघनाचा फोटो किंवा व्हिडिओ पोलिसांना (७८७५७५६११०) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा लागतो.