वाहतूक खात्याचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध

वाहतूक खात्यात भ्रष्टाचार मुक्त सेवा तसेच एजंट मुक्त सेवा पुरविण्याच्या दृष्टीने

03rd January 2018, 03:04 Hrs

प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : वाहतूक खात्यात भ्रष्टाचार मुक्त सेवा तसेच एजंट मुक्त सेवा पुरविण्याच्या दृष्टीने खात्याने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाहतूक कार्यालयात विकले जाणारे ६१ प्रकारचे अर्ज खात्याच्या मोफत ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक खात्याच्या विविध शाखांमध्ये होणारी नागरिकांची गर्दी कमी होणार आहे.
राज्यात इंटरनेट सुविधा नसलेल्या नागरिकांसाठी ३० जून २०१८ पर्यंत विविध कार्यालयांत अर्ज उपलब्ध केले जाणार असल्याचे वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
यामध्ये नवीन किंवा नूतनीकरण वाहन परवाने, नवीन किंवा नूतनीकरण शिकाऊ परवाना, वैद्यकीय प्रमाणपत्र, वाहन तंदुरुस्ती प्रमाणपत्र, नवीन किंवा नूतनीकरण मोटार चालक प्रशिक्षण स्कुलाचे परवाना, वाहन चालक परवान्यात अन्य वाहन परवाना चालक प्रकार जोडणे, नवीन वाहन नोंदणी अर्ज, नवीन वाहन व्यवसाय किंवा नूतनीकरण परवाना तसेच इतर महत्त्वाचे अर्ज मिळून ६१ अर्ज वाहतूक खात्याने www.goatransport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहेत.
=============
नववर्ष पूर्वसंध्येला केवळ ८६ मद्यपी
वाहन चालकांवर कारवाई
प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : राज्यात पोलिसांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला व रात्री मद्यपी तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली. यामध्ये दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी ८६ चालकांविरोधात तर बेशिस्त व धोकादायक पद्धतीने वाहने चालविल्यामुळे ९२ वाहन चालक मिळून १७८ वाहन चालकांविरोधात गोवा पोलिसांनी कारवाई केली आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी पर्यटक नववर्ष साजरे करण्यासाठी दाखल झाले होते. राज्यात नववर्ष साजरे करण्यासाठी किनारी भागात तसेच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्या आयोजित केल्या होत्या. हजारो पर्यटक आपल्या खासगी वाहन घेऊन आले होते. तर काही पर्यटक भाडेपट्टीवर पर्यटक वाहन घेऊन फिरत होते. यामध्ये कित्येक पर्यटक मद्यपी असतात. तरीही पोलिसांकडून केवळ ८६ मद्यपी वाहन चालकांवरच करवाई करण्यात आली. त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, गोवा पोलिसांकडे मद्यपी चालकांची तपासणी करण्यासाठी २१ अल्कोमीटर उपलब्ध आहे. तसेच वाहतूक विभागाने सरकारकडे आणखी अल्कोमीटरचा मागणी प्रस्ताव दिला आहे
वाहतूक खात्याच्या आकडेवारी नुसार ३० ऑक्टोबरपर्यंत १६९ मद्यपी वाहन चालकांविरोधात तसेच या कालावधीत धोकादायक पद्धतीने वाहने चालविल्याप्रकरणी ३६५ वाहन चालकांविरोधात कारवाई केली आहे. या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या मार्गदर्शक तत्वानुसार वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी दि. १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१७ या नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्यातील ४५५चालकांचे वाहन परवाने वाहतूक खात्याने निलंबित केले आहेत.
==================

Top News

गोव्यातील खाणींचा लिलाव न्यायालयाच्या निकालावर अवलंबून

विविध राज्यांतील सुमारे १०० खाणपट्ट्यांचे भूगर्भ सर्वेक्षण सुरू, खाणमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची माहिती Read more

गोव्यातील खनिजावरील निर्यात कर हटवा

मुख्यमंत्र्यांची केंद्रीय खाण मंत्र्यांकडे मागणी Read more

म्हादईप्रश्नी राज्याकडून हस्तक्षेप अर्ज दाखल

पुराव्यासह १०३ पानी अंतर्वादिक अर्ज म्हादई पाणी तंटा लवादासमोर सादर Read more

आमोनियाने उडवली वास्कोवासीयांची झोप

चिखली येथे मध्यरात्री टँकर उलटला, दोन महिलांना इस्पितळात हालवले Read more

काजीभाटमध्ये पाईपलाईनलाही विरोध

स्थानिकांकडून मशीनसमोरच ठाण; सुदिन ढवळीकरांविरोधात घोषणा Read more