महम्मदचा मृत्यू उंचावरून पडल्याने

कुटुंबाकडून घातपाताचा संशय व्यक्त, पोलिस तपासात अपघाताचा निष्कर्ष


28th December 2017, 08:54 pm
नेरुल येथील पुलाखाली मृतदेह सापडेल्या महम्मद जाफरचा मृत्यू उंचावरून पडून जखमी झाल्याने झाला असल्याचा निष्कर्ष शवचिकित्सा अहवालात नमूद करण्यात आला आहे.
नेरुल येथील एका सुपरस्टोअरमध्ये काम करत असलेला महम्मद रात्री ९ वाजता कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला होता. यामागे घातपाताची शक्यता असल्याची भीती त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या मते हा अपघात असून, त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.