एफपीपीसीए शुल्क भरण्यास ६ महिने मुदत

सहा हफ्त्यांमध्ये दंडाशिवाय रक्कम भरण्याची मुभा


28th December 2017, 08:46 pm
एफपीपीसीए शुल्क भरण्यास ६ महिने मुदतवीज खात्याने लागू केलेले एफपीपीसीए शुल्क ६ मासिक हफ्त्यांमध्ये भरण्यास राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. काही उद्योगांनी हे शुल्क भरण्यासाठी हफ्त्यांचा पर्याय देण्याची याचना केली होती.
वीज खात्याशी संपर्क साधून वरील मागणी करणाऱ्या उद्योगांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी मुदतीनंतर शुल्क भरणाऱ्यांना अतिरिक्त दंडात्मक रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.