कोळसा प्रदूषण कमी करा

विरोधक आक्रमक, सत्ताधारी आमदारांचेही पर्यावरणपूरक हाताळणीला समर्थन


15th December 2017, 09:03 pm
मुरगाव बंदरावरून होणाऱ्या कोळसा हाताळणीमुळे वास्को शहर तसेच सभोवतालच्या परिसरात प्रदूषण वाढले आहे. कोळसा हाताळणीवर मर्यादा घालून प्रदूषण कमी करण्याचे आवाहन विरोधी काँग्रेसच्या आमदारांनी केले.
हिवाळी अधिवेशनात कोळशाचा मुद्दा गाजत असताना, सत्ताधारी गटातील मंत्री-आमदारांनीही मर्यादित स्वरुपातील कोळसा हाताळणीला प्राधान्य देण्याची मागणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे केली.
वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी मुरगाव तालुक्यातील लोकांच्या आरोग्याबाबत सर्वेक्षण करण्याची मागणी केली.