आयरिशचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अजामीनपात्र कलम लागू करण्यापूर्वी कल्पना देण्याचे न्यायालयाचे आदेश


15th December 2017, 08:47 pm
शिवोली येथील महिलेचा कथित विनयभंग केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिगीस यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पणजी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
आयरिश यांच्या विरोधात अजामीनपात्र कलम लावण्यापूर्वी ४८ तास आधी त्यांना कल्पना देण्यात यावी, अशी सूचना न्यायालयाने गुन्हे शाखेला केली आहे.