घोगळ येथील कृष्णा रेस्टॉरंटला आग

अंदाजे दीड लाखांचे नुकसान


15th December 2017, 08:45 pm
घोगळ येथील कृष्णा रेस्टॉरंटला आगघोगळ-मडगाव येथील कृष्णा मल्टी क्युझिन रेस्टॉरंटला आग लागून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. पहाटे स्वयंपाकघरात काम सुरू असताना आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे हॉटेल असलेल्या इमारतीतील रहिवाशांची धावपळ उडाली होती.