तिहेरी तलाक ठरणार दंडात्मक

मुस्लिम महिला (विवाह अधिकाराचे संरक्षण) विधेयक २०१७' ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


15th December 2017, 07:11 pm
तिहेरी तलाक ठरणार दंडात्मकमुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक म्हणजे तिहेरी तलाक या विधेयकाला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार आहे. तिहेरी तलाक दिल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद विधेयकाच्या मसुद्यात केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकच्या प्रथेवर सहा महिन्यांची बंदी घातली होती. या कालावधीत केंद्र सरकारला कायदा बनवण्याची सूचना कोर्टाने केली होती. कोर्टाच्या सूचनेनुसार आता केंद्र सरकारने नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. हा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर पत्नीला तोंडी तलाक देण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर गुन्हा दाखल होऊन त्याला तुरुंगवास भोगावा लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने चर्चा करून विधेयकाला मान्यता दिली.