लोकायुक्तांपुढे केवळ ४० पंचांचा आयकर तपशील

परताव्याची माहिती सादर करण्यास ९७ टक्क्यांपेक्षा अधिक लोकप्रतिनिधी अपयशी


14th December 2017, 08:25 pm
लोकायुक्तांपुढे केवळ ४० पंचांचा आयकर तपशीलआर्थिक वर्ष २०१५-१६ या कालावधीत ग्रामपंचायतीवर पंच म्हणून निवडून आलेल्यांपैकी केवळ ४० जणांनीच आपली आयकर परतावा माहिती लोकायुक्तांपुढे सादर केली आहे. राज्यभरात सुमारे १४५० पंचसदस्य असून केवळ ३ टक्के सदस्यांनीच नियमानुसार लोकायुक्तांना आपल्या आर्थिक स्थितीची माहिती पुरवली आहे.
जिल्हा पंचायतीवर निवडून आलेल्या १० सदस्यांनी तर केवळ २ नगरसेवकांनी माहिती देण्याचे सौजन्य दाखवले आहे. स्वायत्त संस्थांच्या अध्यक्षांपैकी केवळ ७ जणांनी आर्थिक स्थिती लोकायुक्तांपुढे स्पष्ट केली आहे.