बेपत्ता शालेय विद्यार्थ्याचा शोध अद्याप जारी

ठवीच्या वर्गात शिक्षणारा अंकित हा मुलगा


22nd November 2017, 03:43 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता
काणकोण : काणकोणच्या माताजी मंदिर वसतीगृहात राहून, चाररस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात शिकणारा अंकित विरेंद्र मोरया (वय १४) हा विद्यार्थी बेपत्ता होऊन आठ दिवस झाले तरी याचा थांगपत्ता लागलेला नाही. काणकोण पोलिसांकडून शाेध जारी आहे.
आठवीच्या वर्गात शिक्षणारा अंकित हा मुलगा बालदिनी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी वसतीगृहातून शाळेत गेला. मात्र शाळा सुटल्यानंतर वसतीगृहात न परतल्याने वसतीगृहातील केअर टेकर श्रीकांत गावकर यांनी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता काणकाेण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मंगळवारी दिवसभर त्याचा शोधाशोध केल्यानंतर वसतीगृहाच्या चालकांनी फतोर्डा, मडगाव येथे राहणारे त्याचे पालक विरेंद्र मोरया यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. अंकितचे पालकही काणकोणात येऊन गेले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबरला अंकितच्या मामांचा उत्तरप्रदेशात विवाह सोहळा असल्याने ते उत्तर प्रदेशात जाणार होते. त्यामुळे त्यांच्या अगोदर अंकित मामाच्या घरी जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मोरया हे कुटुंब मूळ नया मथुरा, उत्तर प्रदेश येथील आहे. अंकीत याने निळ्या रंगाची पॅन्ट व नीळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. त्याची उंची ४.३ फूट असून तो गोरा असल्याची माहिती काणकोण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रेमेडियो डिसोझा यांनी दिली.