लवादासमोर परोब यांची मुद्देसूद उत्तरे

22nd November 2017, 08:35 Hrs
खास प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : म्हादईप्रश्नी गोव्याचे साक्षीदार परेश परोब यांनी मंगळवारी कर्नाटक व महाराष्ट्राच्या वकिलांनी घेतलेल्या उलटतपासणीत मुद्देसूद उत्तरे दिली. त्यानंतर लवादाने विचारलेल्या प्रश्नांवरही गोव्याची बाजू सविस्तरपणे मांडली. परोब यांची उलट तपासणी संपली असून बुधवारी शर्मिला मोंतेरा यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. महाराष्ट्रातर्फे चुकीच्या पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांची दखल घेत लवादानेच उत्तरे दिली. त्यानंतर विचारलेल्या तीन प्रश्नांना परोब यांनी योग्य उत्तरे दिली. लवादाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना परोब यांनी म्हादईचे पाणी पर्यावरणासाठी व वन्यजीवांसाठी महत्त्वाचे असल्याचे म्हणणे लवादसमोर मांडले. सुनावणीवेळी आत्माराम नाडकर्णी, दत्तप्रसाद लवंदे, पूर्णा भंडारी, अक्षया नागळेकर, मयुरी चावला, राजेश शिवोलकर उपस्थित होते.

Related news

कार्निव्हल पर्यटन वाढीसाठी वरदान

मंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन : अन्न व संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन Read more

साखळीत उद्या भव्य कोकणी भजन स्पर्धा

रवींद्र भवन येथे अायोजन : स्वागताध्यक्षपदी सभापती डाॅ. प्रमोद सावंत Read more