नायजेरियात आत्मघातकी बॉम्बस्फोट

सुमारे ५० जण ठार : मशिदीला केले लक्ष्य


22nd November 2017, 04:48 am

नायजेरिया : नायजेरियाच्या उत्तरेकडील प्रांतात दहशतवाद्यांनी जबरदस्त आत्मघातकी बॉम्ब घडवला आहे. मशिदीला लक्ष्य करून मंगळवारी झालेल्या या बॉम्बस्फोटात किमान ५० जणांचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिक पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याने जखमींची संख्या अद्याप मोजण्यात आलेली नाही. तरीही जखमींची संख्या शेकडोंमध्ये आहे, असा अंदाज वर्तवला आहे. अदामावा प्रांतात एका अल्पवयीन आत्मघातकी हल्लेखोराने मशिदीच्या दारावर येऊन बॉम्बची कळ दाबली. काहींनी सांगितल्याप्रमाणे, त्याने मशिदीत येऊन नमाज अदा केली आणि नंतर हे काम केले. मशिदीत शेकडो लोक प्रार्थना करत होते. अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.