मायणा स्पोर्टस् उपांत्य फेरीत


21st November 2017, 03:06 am
क्रीडा प्रतिनिधी | गोवन वार्ता
वास्को : सालतेरो मोंतेरोने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर मायणा स्पोर्टस् क्लबने फादर आग्नेलो युथ क्लब पारोडावर विजय मिळवीत ए.ए.दे. माजोर्डा आयोजित १८ व्या फादर बासिलो आंद्रादे मेमोरिअल कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश
केला.
मुसाण माजोर्डा मैदानावरील झालेल्या या सामन्याच्या पूर्वाधातील १० व्या मिनिटाला मायणा स्पोर्टस् क्लबच्या सालतेरो मोंतेरोने चेंडूला जाळीची दिशा दाखवीत मध्यंतर पर्यंत १-० गोलची आघाडी घेतली होती.
उत्तरार्धातही मायणा स्पोर्टस् क्लबने सामन्यावर वर्चस्व
ठेवीत आघाडी वाढविण्याचे बरेच प्रयत्न केले परंतु फादर
आग्नेलो यूथ क्लब पारोडाने बचावात्मक खेळी केल्याने या सत्रात एकही गोलाची नोंद झाली नाही. तर हा सामान मायणा स्पोर्टस् क्लबने १-० गोलने जिंकून स्पर्धेची उपांत्य फेरी
गाठली.