भगवान महावीर सरकारी माध्यमिक विद्यालयाचे यश


21st November 2017, 03:06 am
वार्ताहर | गोवन वार्ता
केरी - सत्तरी : होंडा सत्तरी येथील भगवान महावीर सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या रमेश गावकर या विद्यार्थ्यांला १९ वर्षांखालील राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त झाले. मध्य प्रदेश येथे झालेल्या या स्पर्धेत त्याने हे यश संपादन केले.
१७ वर्षांखालील राष्ट्रीय पातळीवरील योग स्पर्धेत याच विद्यालयातील अजय आनंद गावकर व विद्यांगी गुरुदास गावडे यांनी सहभाग घेतला होता. छत्तीसगड येथे ही स्पर्धा झाली. या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या शारीरिक शिक्षिका सुलोचना बाराजणकर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापक शीतल कदम, इतर शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे. राज्य पातळीवर त्यांनी चमक दाखविल्याने त्यांची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली होती.