अॅथलेटिक्स स्पर्धेत सरकारी माध्यमिक विद्यालय केरी-सत्तरीचे यश


21st November 2017, 03:05 am
वार्ताहर | गोवन वार्ता
केरी - सत्तरी : सत्तरी तालुका पातळीवरील अॅथलेटिक्स स्पर्धेत सरकारी माध्यमिक विद्यालय केरी-सत्तरीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. म्हापसा पेडे येथे नुकत्याच झालेल्या १७ व १४ वर्षांखालील मुला - मुलींच्या स्पर्धेत हे यश प्राप्त केले.
१७ वर्षांखालील गटातून ऋतिक गावस याने ४०० मीटर धावणे व तिहेरी उडी या दोन्ही स्पर्धांमध्ये रौप्य पदक प्राप्त केले. प्रतीक सिरसाट याने ८०० मीटर धावणेमध्ये दुसरे स्थान व ५००० मीटर चालण्याच्या स्पर्धेत तिसरे स्थान प्राप्त केले.
मुलींमधून ऋतिका झोरे हिने गोळाफेक मध्ये दुसरे स्थान प्राप्त केले. सुलक्षा पर्येकर हिला उंच उडीत तिसरे स्थान तर वैष्णवी दळवी हिला ४०० मीटर धावणेत तिसरे स्थान प्राप्त झाले. १४ वर्षांखालील गटातून मुलींमध्ये माली फालो हिला उंच उडीत सुवर्णपदक, साक्षी गावस हिला ६०० मीटर धावणेत सुवर्णपदक, थाळीफेक मध्ये अनुष्का गावस हिला कास्यपदक, तर २०० मीटर धावणे मध्ये वैष्णवी नाईक हिला चौथा क्रमांक प्राप्त झाला.
मुलांच्या गटातून साहिल पाटील याला ६०० मीटर धावणे प्रथम, २०० मीटर धावणे तिसरे स्थान प्राप्त झाले. अमय माईणकर याला ८० मीटर अडथळा धावणे प्रथम, विकी गावस याला ४०० मीटर धावणे प्रथम स्थान प्राप्त झाले.
दिवान गावस याला ८० मीटर अडथळा धावणे तिसरे स्थान व उंच उडीमध्ये तिसरे स्थान प्राप्त झाले. हेमंत माईणकर याला ४०० मीटर धावणे चौथे स्थान प्राप्त झाले. विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शारीरिक शिक्षक संदेश केसरकर व देवेंद्र गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.