५०वा इफ्फी स्वतंत्र वास्तूत

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची घोषणा, ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन


20th November 2017, 08:21 pm
५०वा इफ्फी स्वतंत्र वास्तूतगोवा हे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कायमस्वरुपी केंद्र की नाही हा वाद बराच मागे पडला असून, येत्या २०१९ सालचा ५० वा इफ्फी स्वतःच्या स्वतंत्र वास्तूत आय़ोजित केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली. ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी, बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, अभिनेत्री श्रीदेवी, अभिनेता शाहीद कपूर यांची यावेळी उपस्थिती होती. अभिनेता राजकुमार राव व अभिनेत्री राधिका आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.