म्हापसा मार्केटमध्ये सध्या ‘असे’ आहेत भाज्यांचे दर... पहा बाजारभाव

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th April, 04:29 pm
म्हापसा मार्केटमध्ये सध्या ‘असे’ आहेत भाज्यांचे दर... पहा बाजारभाव

म्हापसा : सध्या कोणत्याही वस्तूंवर नियंत्रण नसल्यामुळे भाजीपाल्यापासून कडधान्यांचे दर वरचढ होताना दिसत आहे. पुर्वी बहुतेक वस्तूंमया किंमतीमध्ये दरवर्षी वाढ होत होती. मात्र सध्यस्थितीत मागील आठवड्यात असलेला दर समान राहिल याची शास्वती नसते.

भाजीपाल्याचा घाऊक बाजारभाव पाहिल्यास टोमॅटो २५ रुपये प्रतिकिलो दराने म्हापसा बाजारपेठेत विकला जात आहे. आले, लसून, शिमला मिरची, हरवी मिरची आणि लिंबू या वस्तूंनी सध्या लोकांच्या खिशाला कात्री लावली आहेत.

अन्य भाजीपाल्यांचे दर (प्रतिकिला प्रमाणे)

बटाटा २८ ते ३२ रुपये, कांदा २० ते २२ रुपये, गाजर ४० रुपये, वांगी ४० रुपये, ढब्बू मिरची ७० रुपये, कोबी २० रुपये, कॉली फ्लॉवर २४ रुपये, दुधी ३० रुपये, हिरवी मिरची ६० रुपये, आले १७० रुपये, लसून १४० रुपये, भेंडी ४५ रुपये, तर लिंबू ५ रुपये नग, असा दर आहे. निरफणस, तेंडली, चिटकी, वाल पापडी, तांबडी भाजी, मुळा, शेंगा, बीट यांचे दरही वाढलेलेच आहेत.

कडधान्यांचे दर (प्रतिकिलो)

कडधान्यांमध्ये चवळी १२० रुपये, मूग १३० ते १४० रुपये, तूरडाळ १६० ते २०० रुपये, मसूर १०० रुपये, वाटाणे ८० रुपये, हिरवे वाटाणे ११० रुपये, हरभरे १०० रुपये, काबुल चणे १४० ते १६० रु., सोनामसूरी तांदूळ ५५ रु., बासुमती तांदूळ ७० ते १४० रुपये, गहू ३६ ते ४२ रुपये असे दर आहेत.

लाल मिरचीमध्ये प्रतिकिलो

गावठी (नवीन) ५०० रुपये, जुनी ३५० रुपये, हरमलची ८०० रुपये, काश्मिरी ५० रुपये, बेडगी ३०० रुपये, गुंटूर ३०० रुपये. तसेच सध्या आंब्याचा हंगाम चालू असून मानकुराद (प्रति डझन) ८०० ते ९०० रुपये, पायरी ५०० रु. व हुडगो ५०० रूपये असे दर आहेत.

हेही वाचा