गिरीच्या शेतात सापडले कुजलेले मानवी अवशेष

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th March, 04:49 pm
गिरीच्या शेतात सापडले कुजलेले मानवी अवशेष

म्हापसा : सर्वेवाडा, गिरी येथे शेतात कुजलेल्या अवस्थेत मानवी अवशेष सापडल्याने खळबळ माजली आहे. हे अवशेष पुरुषाचे असून त्यावर कपडे होते. म्हापसा पोलिसांनी विखुरलेले हे अवयव एकत्र करून गोमेकॉत शवविच्छेदनासाठी पाठविले. डीएनए रिपोर्टनंतरच हा मृतदेह कुणाचा आहे, हे समजेल.

शुक्रवार, २९ रोजी सकाळी शेतात अत्यंत कुजलेल्या स्थितीत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गिरीतील वेनूसियो लुईस क्रास्टो (५०) हे इसम गेल्या ५ मार्चपासून बेपत्ता झाले होते. त्यामुळे हा मृतदेह कदाचित त्यांचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  म्हापसा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा