रस्त्याकडेला जळालेले साहित्य फेकल्याप्रकरणी गुन्हा नोंदवणार

मुख्यमंत्र्यांनी मागितले वाहतूक खात्याकडून स्पष्टीकरण


20th October 2017, 04:47 pm
रस्त्याकडेला जळालेले साहित्य फेकल्याप्रकरणी गुन्हा नोंदवणारपणजीतील वाहतूक खात्याच्या कार्यालयातील जळालेले साहित्य मेरशी येथील रस्त्याच्या कडेला फेकल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंदवणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला. आपण या प्रकाराबाबत वाहतूक खात्याकडून स्पष्टीकरण मागवले असल्याचे ते म्हणाले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना त्यांनी वरील माहिती दिली. दरम्यान, गोमेकॉतील व्याख्याते व साहाय्यक व्याख्यात्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली असून, अनुक्रमे रु.९५ हजार व रु. ८० हजार प्रति महिना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.