आठ खेळाडूंची फुटबॉल स्पर्धा


20th October 2017, 03:23 am
प्रतिनिधी | गोवन वार्ता
दाभाळ : काजरवाडा - बेतोडा येथील सरस्वती क्रीडा आणि सांस्कृतिक संघ आयोजित ९व्या अखिल गोवा पातळीवरील आठ खेळाडूंच्या फुटबॉल स्पर्धेची उपांत्य व अंतिम फेरी रविवार दि. २२ रोजी बेतोडा - बोरी बायपास जवळील सरस्वती मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
उपांत्य फेरीचे सामने दुपारी २ वाजता बेतोडा येथील आझाद क्रीडा संघ विरुद्ध पॅट्रीक बॉईज कुंभारजुवे यांच्यात तर वाझ कॉटरर फोंडा विरुद्ध सांताक्रुझ बॉईज फोंडा यांच्यामध्ये दुसरा सामना खेळवण्यात येईल.
संध्याकाळी ४ वाजता अंतिम सामना होईल. बक्षीस वितरण कार्यक्रमास आमदार सुभाष शिरोडकर, सरपंच सुशांत गावकर, उपसरपंच मंदा गावडे, उद्योजक दिलीप कामत व इतर मान्यवर उपस्थित असतील.