होली स्पिरीट इन्स्टिट्यूट, मडगावला अजिंक्यपद


20th October 2017, 03:23 am
पणजी : होली स्पिरीट इन्स्टिट्यूट, मडगावने मरिना हायस्कूल, वेर्णाचा ३-१ने पराभव करत सालसेत तालुका मुलांच्या १४ वर्षांखालील स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेचे आयोजन क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातर्फे करण्यात आले होते. मध्यंतरापर्यंत गोलसंख्या २-० अशी होती.
होली स्पिरीटच्या ऑस्कर ब्रागांझाने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करत प्रतिस्पर्धी संघाला दबावात आणले. नॅथन रॉड्रिगीसकडून मिळालेल्या चेंडूला त्याने हेडर करून जाळीत मारले. पाचच मिनिटांनी नॅथनने ही आघाडी दुप्पट करत आघाडी २-० अशी केली.
यानंतर दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. सामन्याचा दुसरा हाफ संपण्यास काही मिनिटे बाकी असताना होली स्पिरीटने आणखी एक गोल करत आघाडी ३-१ अशी करत सामना जिंकवून दिला.