उपकनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धा


20th October 2017, 03:22 am
पणजी : शटलर्स क्लबने गोवा बॅडमिंटन असोसिएशन आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने राज्य उपकनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन इनडोअर स्टेडियम, कांपाल - पणजी येथे करण्यात आले आहे. स्पर्धा दि. २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान सकाळी १० वाजता आयोजित करण्यात येईल.
स्पर्धेत १३ आणि १५ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या एकेरी व दुहेरीत सामने खेळवण्यात येतील. उपांत्यपूर्व किंवा त्यापेक्षा पुढे जाणाऱ्या खेळाडूला दुहेरी गुण देण्यात येतील. इच्छुक खेळाडूंनी आपल्या प्रवेशिका ७७४५०९०४७० या क्रमांकावर एसएमएस किंवा gbagoaonline @gmail. com या ई-मेल क्रमांकावर दि. २६ ऑक्टोबरपूर्वी पाठवाव्यात.