‘सत्तरी अर्बन’च्या म्हापसा शाखेचे उद्या उद्घाटन


20th October 2017, 03:59 am
वाळपई : सत्तरी अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या म्हापसा शाखेचे उद्घाटन शनिवार दि. २१ रोजी संध्याकाळी ४ वा. येथील शिक्षण आस्थापनाच्या बाजूला आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री फ्रान्सिस डिसोझा, आरोग्यमंत्री, म्हापसा नगराध्यक्ष रोहन कवळेकर, सहकार खात्याचे निबंधक सजीव गडकर व सहकार खात्याचे अधिकारी संतोष नाईक, नगरसेवक तुषार टोपले व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सत्तरीतील सहकार क्षेत्रात कार्यरत राहणारी ही आघाडीची संस्था असल्याने या संस्थेने अल्पकाळात भरारी मारलेली आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्था संचालक मंडळाने केले आहे