रामनाथ सॉ मीलचा आज वर्धापनदिन


20th October 2017, 03:54 am
पणजी : सापेद्र - जुने गोवा येथील रामनाथ सॉ मीलचा ३८वा वर्धापनदिना शनिवार दि. २० रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त पाडव्या दिवशी शनिवारी सकाळी १० वाजता सापेद्र येथील ‘विजयश्री' येथे सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यनारायण पूजा झाल्यानंतर आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद
होणार आहे.
आयुष मंत्री आणि उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी ३८ वर्षांपूर्वी पाडव्याच्या मुहूर्तावर रामनाथ सॉ मीलची मुहूर्तमेढ रोवली होती. यावर्षी ३८ वर्षे पूर्ण करून ही मील ३९व्या वर्षात पदार्पण करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवारी सायंकाळी ४ ते ६.३० वाजेपर्यंत राजेंद्र फडते आणि कुटुंबियांतर्फे भजन सादर केले जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ६.३० ते रात्री ९.३० पर्यंत रामनाथ सॉ मील प्रस्तुत आणि रचना क्रिएशन्स निर्मित ‘गाणी मनातील' हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. ‘सारेगमप' फेम कलाकार अमोल माधव पटवर्धन व अभिषेक माधव पटवर्धन हे गायक द्वयी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना कोल्हापूर, सांगली व गोव्यातील कलाकार संगीत साथ करणार आहेत. त्यात हार्मोनिअम धनंजय गाडगीळ, तबला संदेश खेडेकर, साईड ऱ्हिदम गुरू ढोले व गोव्यातील नामांकित सिंथेसायजर वादक बाळकृष्ण मेस्त संगीत साथ करणार
आहेत.