देवदत्त पटनायक यांचे पणजीत व्याख्यान


20th October 2017, 03:49 am
प्रतिनिधी । गोवन वार्ता
मडगाव : दी सेंटर फॉर स्टडी ऑफ मायथोलॉजी अँड कल्चर या संस्थेतर्फे डॉ. देवदत्त पटनाईक यांचे दि रोल ऑफ मायथोलॉजी इन २१ सेंच्युरी इन इंडिया या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वा. पणजीतील कला अकादमीच्या कृष्ण-धवल कक्षात हे व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी गोवा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. वरूण साहनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविणार आहे.
डॉ. देवदत्त पटनाईक हे भारतातील नवीन पिढीचे एक सुप्रसिद्ध व व्यावसायिक दृष्ट्या अतिशय यशस्वी लेखक मानले जातात.भारताच्या पौराणिक कथा तसेच रामायण व महाभारत यासारख्या महाकाव्यांवर एका नवीन आधुनिक पद्धतीने विचार करून त्या पौराणिक कथा संपूर्णपणे नवीन स्वरुपात त्यांनी नवीन पिढीसमोर आणलेल्या आहेत. नवीन पिढीने तेवढ्याच आत्मियतेने त्यांचे स्वागत केले आहे. दूरचित्रवाणीवरील एपिक वाहिनीवर त्यांचा देवलोक विथ देवदत्त पटनाईक हा तरुणाईमध्ये अतिशय लोकप्रिय कार्यक्रम प्रसारीत होत आहे. डॉ. पटनाईक हे पेशाने डॉक्टर आहेत. डॉ. पटनाईक हे जगभरात लेखक व वक्ता म्हणून परिचित आहेत.