जय शहा यांची चौकशी करा !

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांची मागणी

13th October 2017, 02:46 Hrs

पणजी : प्रतिनिधी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कॉँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केली. कॉँग्रेस मुख्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भ्रष्टाचाराच्या विरोधात झिरो टॉलरन्सचा नारा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे. सरकारी पातळीवरून जय शहा यांची पाठराखण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करून शहा यांची पाठराखण करणाऱ्या रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचीही चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही प्रवक्त्या चतुर्वेदी यांनी केली.
जय शहा यांच्या कंपनीने २०१४-१५ या आर्थिक वर्षात ५० हजारांचा महसूल मिळविला होता. त्याच कंपनीचा २०१५-१६ या वर्षातील आर्थिक व्यवहार ८०.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. व्यवसायातील वाढ १६ हजार पट एवढी आहे. या पार्श्वभूमीवर जय शहा यांच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी होण्याची गरज आहे. उलट, या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्याना कॉँग्रेस नेत्यांना लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप चतुर्वेदी यांनी केला.

भाजप सरकारकडून विरोधकांची तोंडे बंद करण्यासाठी दडपशाहीचा वापर केला जात आहे. भाजप नेत्याचा कथित सहभाग असलेल्या देशातील व्यापम व इतर प्रकरणांच्या तपासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. कॉँग्रेसच्या नेत्यांना मात्र टार्गेट केले जात आहे.
- प्रियांका चतुर्वेदी, राष्ट्रीय प्रवक्त्या, काँग्रेस 

Related news

कार्निव्हल पर्यटन वाढीसाठी वरदान

मंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन : अन्न व संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन Read more

साखळीत उद्या भव्य कोकणी भजन स्पर्धा

रवींद्र भवन येथे अायोजन : स्वागताध्यक्षपदी सभापती डाॅ. प्रमोद सावंत Read more