सूचना पाळणा‌ऱ्यांनाच शॅकसाठी परवाना

पर्यटन खात्याच्या सूत्रांची माहिती : उत्तरेत २५७, दक्षिणेत ८९ शॅकना मान्यता

13th October 2017, 02:45 Hrs

पणजी : प्रतिनिधी
पर्यटन खात्याने समुद्र किनाऱ्यावर उभारण्यात येणाऱ्या शॅकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, टॉयलेट, कचरा विल्हेवाट व इतर सुविधा देण्याची सूचना केली आहे. पर्यटन खात्याच्या सूचनांचे पालन करणाऱ्या शॅक चालकांना पर्यटन हंगामासाठी शॅक चालविण्यासाठी अंतिम ‘ना हरकत' दाखला दिला जाणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
पर्यटन खात्याने उत्तर गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर आत्तापर्यंत २५७ शॅक उभारण्यासाठी मान्यता दिली आहे. उत्तर गोव्यात एकू्ण २५९ शॅक उभारली जाऊ शकतात. दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर ८९ शॅक उभारण्यासाठी मान्यता दिली आहे. दक्षिण गोव्यात एकू्ण १०५ शॅक उभारली जाऊ शकतात, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
पर्यटन खात्याने शॅकसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. या तत्त्वांचे पालन करणाऱ्यांना पर्यटन हंगामासाठी व्यवसाय करण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे. त्यामुळे पर्यटन खात्याने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि गोवा किनारी व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या सहकार्याने नव्याने उभारण्यात आलेल्या शॅकची पाहणी सुरू केली आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

बाटल्यावर बंदीची अद्याप अधिसूचना नाही
राज्यातील समुद्र किनाऱ्यावरील खासगी जागेत शॅक उभारणाऱ्या व्यावसायिकांनी प्रथम किनारी व्यवस्थापन प्राधिकरण आणि स्थानिक पंचायत यांच्याकडून शॅक उभारण्यासाठी मान्यता घेतली पाहिजे. त्यानंतर व्यावसायिकांनी शॅक उभारण्यासाठी पर्यटन खात्याकडे अर्ज केला पाहिजे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. समुद्र किनाऱ्यावर बॉटल्स नेण्यावर बंदी घालण्याचे संकेत पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी दिले होते; परंतु बॉटल्स किनाऱ्यावर नेण्यावर बंदीसाठी अद्यापपर्यंत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. बॉटल्सचा विषय अबकारी खात्याच्या अखत्यारित येतो, अशी माहिती पर्यटन खात्याच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

Related news

पेडणेत कार्निव्हल सर्वधर्मसमभाव संस्कृती राखण्यासाठी

मंत्री आजगावकर यांचे प्रतिपादन : राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून कार्निव्हल विरोधी घोषणा Read more

प्रगत शेती - समृद्ध शेतकरी उद्दिष्ट अपूर्णच

सरकारकडून विशेष प्रयत्न : युवकांची नकारात्मक मानसिकता Read more

Top News

मोपा विस्थापितांसाठी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू

१४ कुटुंबांना प्रत्येकी ८०० चौ.मी.जमीन Read more

सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली उपसमिती

ग्रेटर पणजी पीडीए; मागण्या ऐकून लवकरच निर्णय Read more

पर्यटनमंत्र्यांवर कारवाई करा : काँग्रेस

मोपा विमानतळाचे काम बंद पाडल्याचे प्रकरण Read more

आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत

वाहतूक खोळंबल्याने चाकरमान्यांचे हाल : पणजीत येण्यासाठी प्रवाशांची पायपीट : पायलट, रिक्षा चालकांची मनमानी Read more