पॅराग्वे संघाची न्यूझीलंडशी गाठ

08th October 2017, 08:32 Hrs
मुंबई :
पहिल्या सामन्यात आपल्या आक्रमक खेळामुळे विजय नोंदवणारा पॅराग्वे फिफा १७ वर्षांखालील विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध सोमवारी होणाऱ्या सामन्यात आपले विजयी अभियान कायम राखण्याच्या इरद्याने मैदानात उतरणार. पॅराग्वेने मालिविरुद्ध शेवटचा सामना ३-२ने आपल्या नावावर केला होता.
पहिल्या हाफमध्ये पॅराग्वे​ शानदार खेळ दाखवला मात्र दुसऱ्या हाफमध्ये त्यांची आक्रमकता कमी झाली. मात्र प्रशिक्षक गुस्तावो यांना वाटते की, ५५व्या मिनिटाला तिसरा गोल केल्यानंतर त्यांच्या प्रदर्शनात सुधारणा झा​ली.
पॅराग्वेसाठी लियांड्रो सांचेजचा फॉर्म महत्त्वाचा आहे. त्याला त्यांच्या प्रशिक्षकांनीही दमदार खेळाडू म्हणून करार दिले आहे. या दक्षिण अमेरिकेच्या संघाकडे आक्रमण, रक्षण आणि मधल्या फळीत चांगले खेळाडू आहेत. मात्र मालीच्या संघाने सलग दोन गोल करत त्यांच्या बचाव फळीतील उणिवाही जगजाहीर केल्या.
न्यूझीलंडकडेही आक्रमक खेळ करणारे खेळाडू आहेत व अशात पॅराग्वेच्या बचावफळीने केलेली थोडीशी चूक त्यांच्या अभियानासाठी घातक ठरू शकते. पॅराग्वे चौथ्यांदा १७ वर्षांखालील विश्वचषकात सहभागी होत आहे. ते १९९९ मध्ये न्यूझीलंडमध्ये पाचव्या स्थानावर राहिले होते. ते प्रदर्शन त्यांचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन होते. जर पॅराग्वे न्यूझीलंडवर विजय मिळवतो तर १७ वर्षांनी ते पुन्हा बाद फेरीत पोहोचतील. यापूर्वी २००१ आणि २०१५ साली ते गट फेरीतून बाहेर झाले होते.
न्यूझीलंड आपला कर्णधार मॅक्स माटाशिवाय या सामन्यात उतरणार. माटाला तुर्कीविरुद्ध बरोबरीत सुटलेल्या सामन्यात रेफ्रीने पिवळे कार्ड दाखवले होते. न्यूझीलंडचा संघ खूप आधीच भारतात पोहोचला होता. ते आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. ते ब्राझिल आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात पराभूत झाले होते. तुर्कीविरुद्ध पहिला सामना त्यांनी १-१ने बरोबरीत सोडवला होता मात्र पॅराग्वेविरुद्ध त्यांना जबरदस्त प्रदर्शन करावेच लागणार.

Top News

चारशे पदांना सरकारची मंजुरी

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील समितीचा निर्णय Read more

खाण प्रश्नाबाबतची बैठक लांबणीवर

अवलंबितांत निराशा; आमदारांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा Read more

आराडी-बांध येथील नळ कोरडे; मोर्चाची तयारी

पाणी विभागावर मोर्चा आणून अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे. Read more

राज्यातील सर्व खाणी सुरक्षित

पावसाळ्यातील खाण सुरक्षेचा सचिवांकडून आढावा Read more