भारतासमोर अनुभवी अमेरिकेचे आव्हान

05th October 2017, 09:15 Hrs
नवी दिल्ली :
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या फीफा १७ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघ आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात अमेरिकेच्या मजबूत संघाविरुद्ध घरच्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत चांगला खेळ करण्यास भारतीय संघ तयार आहे.
भारताच्या भूमीवर पहिल्यांदाच होणाऱ्या फीफा स्पर्धेत जगातील २४ देश सहभागी होणार आहेत. ही स्पर्धे २८ ऑक्टोबर पर्यंत देशातील विविध सहा शहरांमध्येही होणार आहे व यात गोवाही सहभागी आहे.
भारत या स्पर्धेचा यजमान असल्यामुळे भारताला या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. भारतासाठी ही स्पर्धा आजपर्यंतची सर्वांत मोठी स्पर्धा ठरणार आहे. भारतीय संघ दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे. येथे भारताचा पहिला सामना मजबूत अमरिकेशी होणार आहे. अमेरिकेने आजपर्यंत झालेल्या १६ पैकी १५ स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.
अमेरिकेने आतापर्यंत केवळ २०१३ साली एकदाच या स्पर्धेत सहभाग घेतला नाही त्यामुळे भारतीय संघासमोर केवळ मजबूतच नव्हे तर विश्वचषकातील सर्वांत अनुभवी संघाचे आव्हान भारतासमोर असणार आहे. याशिवाय अमेरिकेच्या संघातील २१ पैकी १२ खेळाडू जगातील मोठ्या फुटबॉल लीग आणि क्लबांसाठी खेळत आहेत.

Top News

चारशे पदांना सरकारची मंजुरी

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील समितीचा निर्णय Read more

खाण प्रश्नाबाबतची बैठक लांबणीवर

अवलंबितांत निराशा; आमदारांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा Read more

आराडी-बांध येथील नळ कोरडे; मोर्चाची तयारी

पाणी विभागावर मोर्चा आणून अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे. Read more

राज्यातील सर्व खाणी सुरक्षित

पावसाळ्यातील खाण सुरक्षेचा सचिवांकडून आढावा Read more