सरोगसी प्रकरण : आफ्रिदी दाम्पत्याच्या कोठडीत वाढ

04th October 2017, 06:22 Hrs
पणजी : प्रतिनिधी
वास्को येथील सरोगसी प्रकरणात अटकेत असलेले मुख्य संशयित शोएब आफ्रिदी आणि त्याची पत्नी सालाद आफ्रिदी तसेच मध्यस्थी महिला तस्लीम हजीम या तिघांना बाल न्यायालयाने आणखी सात दिवस पोलिस कोठडी ठोठावली आहे. आफ्रिदी दाम्पत्याने न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.
वास्को येथील एका पंधरावर्षीय अल्पवयीन मुली बरोबर सरोगेट मदर होण्यासाठी संशयित शोएब आफ्रिदी यांनी मध्यस्थी तस्लीम हजीम हिच्यामार्फत संपर्क साधला. यासाठी रीतसर करार केला होता. या करारानुसार त्या मुलीला मूल झाल्यानंतर पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. परंतु, संशयित आफ्रिदी यांनी पीडित अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी भादंसंच्या ३७६, ३६६(ए), व ४२० नुसार, बाल कायद्याचे कलम ८ (२) व ८(१२) नुसार आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Top News

चारशे पदांना सरकारची मंजुरी

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील समितीचा निर्णय Read more

खाण प्रश्नाबाबतची बैठक लांबणीवर

अवलंबितांत निराशा; आमदारांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा Read more

आराडी-बांध येथील नळ कोरडे; मोर्चाची तयारी

पाणी विभागावर मोर्चा आणून अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे. Read more

राज्यातील सर्व खाणी सुरक्षित

पावसाळ्यातील खाण सुरक्षेचा सचिवांकडून आढावा Read more