अनुजा जोशींच्या कवितांमध्ये नाविन्याची झलक : अरुणा ढेरे


25th September 2017, 05:31 am
प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : मध्यंतरीच्या काळात कवितांमधील नावीन्य विषय हरवले होते. कवयित्री अनुजा जोशी हिने आपल्या ‘उन्हाचे घुमट खांद्यावर' या कविता संग्रहातून आत्मविश्वासाने नवीन विषय मांडून कवितांमध्ये पुन्हा नावीन्य आणले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांनी केले.
लोकवाङ्मय गृह प्रकाशनतर्फे येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) सभागृहात आयोजित अनुजा जोशी लिखित उन्हाचे घुमट खांद्यावर या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी माजी केंद्रीय कायदे मंत्री रमाकांत खलप, ज्येष्ठ समीक्षक सोमनाथ कोमरपंत, आयएमबीचे अध्यक्ष संजय हरमलकर, साहित्यिक सतीश काळसेकर, कवी वीरधवल परब, कवयित्री अनुजा जोशी, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत आदी मान्यवर व्यास​पीठावर उपस्थित होते. सतीश काळसेकर म्हणाले की, अनुजा जोशी यांच्या कवितांमध्ये स्त्री केंद्रस्थानी आहे. मात्र तिच्या कवितांमध्ये नवीन विषय अाहे. ते नाविण्य जाणवत असल्याचे म्हणाले.