अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी एकाला जामीन


25th September 2017, 05:29 am
प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोन लाख २० हजार किमतीचा अमलीपदार्थ बाळगल्या प्रकरणी मूळ आंध्रप्रदेश येथील सध्या कोरगाव - पेडणे येथे राहणाऱ्या अनिल कुमार (वय २३) या युवकाला ५० हजार रुपये आणि इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने १० सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी १४.२० ते सायंकाळी १७.३० या दरम्यान शिवोली - चोपडे पुलाजवळ शिवोली बाजूने असलेल्या रस्त्यावर पी. अनिल कुमार या २३ वर्षीय युवकाला ताब्यात घेतला. त्याच्याकडून २ लाख २० हजार किमतीचे ११० ग्रॅम हशीष अमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणी पथकाने त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपनिरीक्षक मंजूनाथ नाईक यांनी अमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ च्या कलम २० (बी)ii (बी) नुसार गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर त्याला न्यायालयाने संशयिताला पोलिस कोठडी ठोठावली.
संशयित राज्याबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्याने संशयिताला जामीन मंजूर करू नये, असे म्हणणे तपास अधिकारी नाईक यांनी न्यायालयात सादर केले होते. अॅड. एम. नाझारेथ यांनी संशयित पोलिस तपासात सहकार्य करण्यास तयार असून पोलिस तपास पूर्ण झाल्याचा युक्तिवाद केला. त्यामुळे संशयिताला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.