विश्वनाथन आनंद, हरिकाची विजयी सलामी


24th September 2017, 08:03 pm
विश्वनाथन आनंद, हरिकाची विजयी सलामीआईल ऑफ मॅन : पाचवेळचा विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद आणि भारतीय ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्लीने येथे आईल ऑफ मॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. आनंदने शनिवारी रात्री झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या मार्क एसरमॅन तर हरिकाने इंग्लंडच्या ओयामा अकितोला पराभूत केले.
सफेद मोहऱ्यांनी खेळताना आनंदने ४६ चालींमध्ये विजयाची नोंद केली. दुसऱ्या फेरीत आनंदचा सामना जर्मनीच्या लँपर्ट जोनासशी होईल. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावरील खेळाडू हरिकाने पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना आपल्या पुरुष प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले. दुसऱ्या फेरीत ती आता जर्मनीचा फिडे मास्टर बाबर मायकलशी लढणार. भारताचा एसपी सेतुरमन, विदीत संतोष गुजराती, बी अधिबान आणि वैशालीही या स्पर्धेत खेळत आहेत.