श्रीलंका क्रिकेटची आयसीसीकडून चौकशी


24th September 2017, 08:02 pm
श्रीलंका क्रिकेटची आयसीसीकडून चौकशीदुबई : आतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंकेविरुद्ध भ्रष्टाचारासंबंधी तपास सुरू केला मात्र अद्याप स्पष्ट नाही झाले की कोणती मालिका ही आयसीसीच्या तपासाच्या कक्षेत येणार आहे. आयसीसीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, आयसीसीची भ्रष्टाचार विरोधी समितीने तपासाचा एक भाग म्हणून श्रीलंकेचा दौरा केला.
आयसीसीच्या समितीचे महाप्रबंधक अॅलेक्स मार्शल यांनी सांगितले, आयसीसीची भ्रष्टाचार विरोधी संस्था क्रिकेटमध्ये इमानदारी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करते आणि यात त्या जागांवर जाऊन चौकशी करणे आहे जेथे आम्हाला भ्रष्टाचाराचा संशय आहे. श्रीलंकेने झिंबाब्वेविरुद्ध मायदेशात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-३ने गमावली होती तर भारताविरुद्ध ३ कसोटी मालिका, पाच एकदिवसीय सामने आणि एक टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका गमावली होती.
आयसीसीने सांगितले, सध्या श्रीलंकेत भ्रष्टाचार विरोधी समितीचा तपास चालू आहे. याचा एक भाग म्हणून आम्ही अनेक लोकांशी चर्चा करत आहोत. आयसीसीने पुढे म्हटले, चालू असलेल्या तपासावर आम्ही कोणत्याही प्रकारची टिप्पणी करणार नाही.