बार्सिलोनाचा ला लीगात सलग सहावा विजय


24th September 2017, 08:01 pm
बार्सिलोनाचा ला लीगात सलग सहावा विजयमाद्रिद : बार्सिलोनाने लुई सुआरेजच्या गोल बरोबरच प्रतिस्पर्धी संघाच्या दोन आत्मघाती गोलमुळे ​गिरोनाविरुद्ध ३-०ने विजय मिळवत ला लीगा फुटबॉल टुर्नामेंटमध्ये सलग सहाव्या विजयाची नोंद केली. हा सामना बार्सिलोनाने ३-०ने आपल्या नावावर केला.
दरम्यान रियल बेटिसविरुद्ध झालेल्या पराभवातून स्वत:ला सावरत रियल माद्रिदने डॅनी केबालोसच्या दोन गोलांच्या जोरावर एलावेसचा २-१ने पराभव करत आपल्या गटात चौथे स्थान मिळवले. तरीही बार्सिलोना आणि माद्रिदमध्ये अजूनही सात गुणांचे अंतर आहे.
बार्सिलोनाविरुद्ध एडे बेनिट्ज आणि गोलकीपर गोर्का इराइजोजने स्वयं गोल केले. बार्सिलोनाचे ६ सामन्यात ६ विजयानंतर १८ गुण आहेत. माद्रिदचे ६ सामन्यात तीन विजय, दोन अनिर्णित व एका पराभवानंतर ११ गुण आहेत