कोकणी भाषेच्या विकासासाठी संशोधनाची गरज

 कुलगुरू प्रा. सहानी यांचे मत : प्रा. भूषण भावे यांच्या ‘साहित्य विमर्ष’चे प्रकाशन

14th September 2017, 03:34 Hrs
प्रतिनिधी
गोवन वार्ता
फोंडा : कोकणी भाषेचे संवर्धन व विकासासाठी भाषिक तसेच तिच्या उच्चारांविषयी संशोधनाची गरज असल्याचे मत गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अरुण सहानी यांनी व्यक्त केले. कोकणी भाषेत हिंदी शब्दांची सरमिसळ होत असल्याने संशोधनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणी लेखक प्रा. भूषण भावे यांच्या ‘साहित्य विमर्ष' या कोकणी लेखसंग्रहाचे फर्मागुडी येथे आयोजित कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. या समारंभात ते बोलत होते. यावेळी फोंड्याचे आमदार रवी नाईक, अॅड. उदय भेंब्रे, प्रा. किरण बुडकुले, प्रकाश धारवटकर, विकास पिसुर्लेकर, गुरुनाथ खानोळकर व डॉ. एस. एन. मामलेदेसाई उपस्थित होते.
कोकणी ही अल्पसंख्य भाषा आहे. तिचे रक्षण व विकास करण्यासाठी ती योग्यपणे समजून घेतली पाहिजे. अल्पसंख्य भाषांमध्ये हिंदी भाषेतील शब्द घुसडले जात आहेत. साहित्य संशोधन महत्त्वाचे असले तरी भाषेचे संशोधन आम्ही करीत नसतो. लिहिल्या जाणाऱ्या आणि बोलल्या जाणाऱ्या शब्दांत फार मोठा फरक असतो. लिखित शब्द हे झाडाच्या मुळा सारखे असतात हे जाणून घ्यायला हवे, असेही प्रा. सहानी यांनी सांगितले.
कोकणी भाषेतील शब्दांत विविधता आढळते. या शब्दांचा संग्रह करण्यासाठी भाषिक व उच्चार यात संशोधन करायला हवे. ते करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायला हवे. ज्ञानाची निर्मिती महत्त्वाची असते. आर्थिक मदत देऊन सर्जनशील लेखनाला प्रोत्साहन द्यायला हवे, असे मतही त्यांनी मांडले. यावेळी आमदार रवी नाईक, किरण बुडकुले व भूषण भावे यांनीही विचार मांडले.

Related news

पेडणेत कार्निव्हल सर्वधर्मसमभाव संस्कृती राखण्यासाठी

मंत्री आजगावकर यांचे प्रतिपादन : राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून कार्निव्हल विरोधी घोषणा Read more

प्रगत शेती - समृद्ध शेतकरी उद्दिष्ट अपूर्णच

सरकारकडून विशेष प्रयत्न : युवकांची नकारात्मक मानसिकता Read more

Top News

कॉर्पोरेशन बँकेला ३१ लाखांचा गंडा

बनावट सोने तारण ठेवून घेतले कर्ज, दाम्पत्यासह सोनाराविरोधात गुन्हा दाखल Read more

त्या उपनिरीक्षकाची बदली

वेर्णा पोलिस स्थानकातून राखीव दलात रवानगी Read more

अर्शलाला न्याय द्या

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची कुटुंबियांची मागणी Read more

म्हापशात वाहतूक पोलिसाला ठोकरले

बांबोळी येथे दाखल, इको कारचालकाला अटक Read more