Update
   कोलवाळ येथे टाटा अेस गाडीला आग, ९० हजारांचे नुकसान   बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम चोरीप्रकरणी दोघा संशयितांना अटक

सायनाकडून श्रद्धा कपूर घेतेय बॅडमिंटनचे धडे

अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या बॅडमिंटन कोर्टवर दिसत आहे. ती चक्क भारताची फुलराणी सायना नेहवालकडून बॅडमिंटनचे धडे घेत आहे.

14th September 2017, 03:33 Hrs
नवी दिल्ली : अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या बॅडमिंटन कोर्टवर दिसत आहे. ती चक्क भारताची फुलराणी सायना नेहवालकडून बॅडमिंटनचे धडे घेत आहे.
सायना नेहवालच्या जीवनावर आधारित लवकरच एक बायोपिक येत आहे. ज्यामध्ये सायनाच्या भूमिकेत श्रद्धा झळकणार आहे. एखादी व्यक्तीरेखा साकारायची तर त्या व्यक्तिमत्वाचे गुण-अवगुण अभ्यासने हे कोणत्याही कलाकारासाठी महत्त्वाचे असते. म्हणूनच या बायोपिकमध्ये कोणतीही कसर राहू नये यासाठी श्रद्धा कसून प्रयत्न करत आहे. त्यासाठी तिने थेट सायनालाच गाठले असून, आंतरराष्ट्रीय दर्जावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या या खेळाडूकडून ती बॅडमिंटनचे धडे घेत आहे. दरम्यान, केवळ बॅडमिंटन किंवा त्यातले बारकावे शिकणे इतकाच माफक विचार करून श्रद्धा तिथे पोहोचलेली नाही. तर, व्यक्तिमत्व म्हणून सायना कशी आहे. तिच्या आजवरच्या जीवनातील चढ-उतार कसे राहिले. त्यातून तिने कसा मार्ग काढला. अत्यंत आनंदाच्या आणि दु:खाच्या क्षणी ती कशी रिअॅक्ट होते. यांसारख्या अनेक छोट्यामोठ्या गोष्टी तिला समजून घ्यावयाच्या आहेत. दरम्यान, सायनाने आपल्या बॅडमिंटन सरावा दरम्यानची काही छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत. ज्यात तिच्यासोबत श्रद्धा कपूर आणि तिचा प्रशिक्षक पुलेला गोपीचंदही दिसत आहेत. या छायाचित्राखाली, ‘बॅडमिंटन प्रॅक्टीस सेशन, गोपी सर, श्रद्धा कपूर आणि मी', असे सायनाने लिहीले आहे.
इंस्टाग्रामवरही सायनाने एक छायाचित्र शेअर केले असून, त्यातही सायना आणि श्रद्धा दिसत आहेत.

Top News

काणकोणात पाणी टंचाईची शक्यता

यंदा ८३ इंच पावसामुळे चापोली धरण जलाशयाची पातळी कमी Read more

दप्तरासंबंधी​ वास्कोत लवकरच बैठक

मुरगाव पालिका मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांची माहिती : परिपत्रकाची माहिती देणार Read more

पुरावे नसल्याने अधिकारी दोषमुक्त

चावडी रुबी रेसिडन्सी प्रकरण Read more

योगीराज कामत आज एसआयटीसमोर

प्रकृती अस्वाथ्यामुळे दिगंबर कामत चौकशीसाठी गैरहजर Read more