Update
   सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात व्यत्यय, दीपक गडेकर याला २ महिने कैद   गोवा राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय समितीवर तिघा सदस्यांची नियुक्ती   पश्चिम बंगालच्या नागरिकाकडून कळंगुट येथे ३० हजाराचा गांजा जप्त   रावणफोंड येथे बारमालकावर बिअर बाटल्यांनी हल्ला, हॉस्पिसियोत दाखल

हेलिपॅडवरील वैध गाळ्यांचे पुनर्वसन

 मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : पालयेकर, काब्रालांसह पाहणी

14th September 2017, 03:29 Hrs
प्रतिनिधी
गोवन वार्ता
म्हापसा : वागातोर हेलिपॅड समुद्र किनाऱ्याचे सुशोभिकरण करण्यात येणार असून या ठिकाणी असलेल्या २२ कायदेशीर गाळ्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले.
गोवा पर्यटन विकास महामंडळाने हेलिपॅडवरील गाळे हटविण्याच्या कारवाईवेळी पोलिस संरक्षण मागितल्याची माहिती गाळेवाल्यांना मिळाली होती. याबाबतीत या स्थानिक गाळेवाल्यांनी जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली होती. जलस्रोतमंत्री पालयेकर यांनी ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मंत्री पालयेकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन आमदार नीलेश काब्राल यांच्यासमवेत बुधवारी वागातोर हेलिपॅड येथे भेट दिली व पाहणी केली. यावेळी पंच सुरेंद्र गोवेकर उपस्थित होते.
गाळेवाल्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ७२ गाळ्यांवाल्यांची यादी सादर केली. गोवा पर्यटन विकास महामंडळाकडे फक्त २२ गाळ्यांची नोंदणी आहे. त्यामुळे या गाळ्यांचेच पुनर्ववसन करण्यात येईल. इतरांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. वागातोर हेलिपॅडला जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी नेरूल किल्ल्याची पाहणी केली.
२०१२ मध्ये पर्यटन विकास महामंडळाने वागातोर हेलिपॅड परिसरातील सुमारे ८० लाख चौ.मी. जागा अनुभव शर्मा व सुपर्ब अॅडव्हेंचर्स या दिल्ली स्थित कंपनीना इको टुरिझमसाठी ३० वर्षांच्या लीजवर दिली होती. सदर कंपनींना गोवा किनारी व्यवस्थापन प्राधिकरण (सीआरझेड) व हणजूण-कायसूव पंचायतीने समुद्रकिनारी बांधकाम करण्यास ‘ना हरकत' दाखल दिला होता. ही जागा किनाऱ्यापासून २०० मीटरच्या आत आहे. या जागेत बांधकाम करता येत नसल्याचा दावा करून या दाखल्यास हणजूणच्या तत्कालीन चार पंचांनी राष्ट्रीय हरित लवादासमोर आव्हान दिले होते.
या याचिकेच्या आधारे सदर कंपनींना बांधकाम करण्यास मज्जाव करणारा आदेश हरित लवादाने दिला होता. हरित लवादाच्या आदेशानुसार कंपनींकडून करण्यात आलेली बांधकामे जमीनदोस्त करण्याची वेळ गोवा पर्यटन विकास महामंडळावर आली होती. हरित लवादात हे प्रकरण सुरू असताना गोवा पर्यटन विकास महामंडळाने हे गाळे हटविण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केला होता. या कारवाईस विरोध करणाऱ्या काही गाळेवाल्यांना पोलिसांनी अटकही केली होती.

Related news

कोलवाळ थांब्याचे छत उडाल्याने गैरसोय

 प्रवाशांतून तत्काळ दुरुस्तीची मागणी Read more

कोलवाळ थांब्याचे छत उडाल्याने गैरसोय

 प्रवाशांतून तत्काळ दुरुस्तीची मागणी Read more

Top News

कॅशलेस : पोलिसांना द्यावा लागेल जबाब

कॅसिनोंतील जागृतीसाठीच्या उपाययोजनाही कराव्या लागणार स्पष्ट : कृती अहवाल पाठविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गुरुवारपर्यंतची मुदत Read more

राज्य सहकारी बँकेवर आजपासून प्रशासक

 त्रिसदस्यीय मंडळाची नेमणूक : संचालक मंडळाचा राज्य सरकारवर असहकार्याचा ठपका Read more

बाबल कवळेकरांच्या आजच्या जबाबाकडे राज्याचे लक्ष

अटकपूर्व जामीन अर्जावरही आजच सुनावणी Read more