Update
   कोलवाळ येथे टाटा अेस गाडीला आग, ९० हजारांचे नुकसान   बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम चोरीप्रकरणी दोघा संशयितांना अटक

सिंधूची विजयी सलामी

 कोरिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा : आश्विनी-रँकिरेड्डीची शानदार सुरुवात

14th September 2017, 04:28 Hrs
सेऊल : भारताच्या पी. व्ही. सिंधूने कोरियन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी विजयी सुरुवात केली आहे. सायना नेहवालने या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर भारताकडून महिला एकेरीत सिंधू ही एकमेव महिला खेळाडू मैदानात उतरली आहे. सिंधूने पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या चेयाँग नँग हिचा २१-१३, २१-८ असा धुव्वा उडवला.
सिंधूने पहिल्या सेटच्या सुरुवातीला आघाडी घेतली. ६-३ अशा आघाडीवर असताना चेयाँगने सिंधूला टक्कर देत आघाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला होता. या आक्रमक खेळामुळे पिछाडीवर गेलेल्या सिंधूने काही खराब फटके खेळले, याचा लाभ उठवत प्रतिस्पर्धी चेयॉँगने सामन्यात ८-८ अशी बरोबरी साधली. यानंतर पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सिंधूकडे ११-१० अशी एका गुणाची आघाडी होती.
परंतु, मध्यतरानंतर अवघ्या काही मिनीटांमध्ये सिंधूने सामन्यात ८ गुणांची आघाडी प्राप्त केली. पहिला सेट २१-१३ अशा फरकाने जिकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने चेयाँगला सामन्यात पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला सिंधूकडे ८-४ अशी आश्वासक आघाडी होती. मध्यंतरापर्यंत सिंधूने सेटवर आपली पकड मजबूत ठेवताना आघाडी ११-६ अशी भक्कम केली होती. मध्यंतरानंतर आपल्या खेळाची गती वाढवत सिंधूने दुसरा सेट २१-८ असा जिंकत सामन्यावर आपले नाव कोरले. पुढच्या फेरीत सिंधूची लढत थायलंडच्या निकॉन जिंदपॉलशी होणार
आहे.
राष्ट्रकुल विजेत्या पी. कश्‍यपने जुलै महिन्यात झालेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. आपला फॉर्म कायम राखताना कश्‍यपने पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात तैपईच्या लिन यू हसिन याचा २१-१९, २१-९ असा ३५ मिनिटांत पराभव केला. तसेच दुसऱ्या पात्रता लढतीत त्याने तैपेईच्याच केन चाओ यू याच्यावर २१-१९, २१-१८ अशी संघर्षपूर्ण मात करताना मुख्य स्पर्धेत स्थान मिळविले.
आता मुख्य ड्रॉमधील पहिल्या फेरीत कश्‍यपसमोर तैपेई चीनच्या हसु जेन होव याचे आव्हान आहे. कश्‍यपने होवला याआधी तीनवेळा पराभूत केले असले, तरी होवनेही एकदा बाजी उलटविली आहे. मिश्र दुहेरीत आश्‍विनी पोनप्पा व सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी या भारतीय जोडीने पीटर काएसबॉवर व ओल्गा कॉनोन या जर्मन जोडीचा २१-१२, २१-१५ असा पराभव केला. तसेच निर्णायक पात्रता लढतीत रोनाल्ड व अनिसा सौफिका या जोडीचा २७-२५, २१-१७ असा पराभव करताना मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले. मुख्य ड्रॉमधील पहिल्या फेरीत त्यांच्यासमोर तांग चुंग मान व त्से यिंग सुएत या हॉगकॉंगच्या जोडीचे
आव्हान आहे.
कश्यपचा मुख्य फेरीत प्रवेश
भारताचा अव्वल पुरुष खेळाडू पारुपल्ली कश्‍यपने तैपेई चीनच्या खेळाडूंवर सलग दोन विजयांची नोंद करताना या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळविला. तसेच आश्‍विनी पोनप्पा व सात्विकसाईराज रॅँकिरेड्डी या जोडीनेही मिश्र दुहेरी गटात मुख्य स्पर्धेत स्थान मिळविले.

Top News

काणकोणात पाणी टंचाईची शक्यता

यंदा ८३ इंच पावसामुळे चापोली धरण जलाशयाची पातळी कमी Read more

दप्तरासंबंधी​ वास्कोत लवकरच बैठक

मुरगाव पालिका मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांची माहिती : परिपत्रकाची माहिती देणार Read more

पुरावे नसल्याने अधिकारी दोषमुक्त

चावडी रुबी रेसिडन्सी प्रकरण Read more

योगीराज कामत आज एसआयटीसमोर

प्रकृती अस्वाथ्यामुळे दिगंबर कामत चौकशीसाठी गैरहजर Read more