पणजी, मडगावातील मासळी दर्जेदार

 अन्न आणि औषध प्रशासनाच्या चाचणीतून स्पष्ट


14th September 2017, 01:45 am
विशेष प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : पणजी आणि मडगाव बाजारातून ज्या ताज्या मासळीचे नमुने घेतले होते, त्यात कसल्याही प्रकारचे रसायन किंवा रंग समाविष्ट नाहीत, असे अन्न आणि औषध प्रशासनाने घेतलेल्या चाचणीत स्पष्ट झाले आहे.
राज्यात ताज्या मासळीत फॉर्मालिन हे रसायन, तसेच रंग मिसळले जातात, अशी तक्रार आली होती. त्यानंतर मत्स्य व्यवसाय मंत्री विनोद पालयेकर यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी (पान ४ वर)
करण्याचे निर्देश दिले होते. मत्स्य व्यवसाय खाते आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्तपणे पणजीतून दोन, तर मडगावमधून ताज्या मासळीचे आठ नमुने घेतले.
पणजी आणि मडगावच्या एसजीपीडीए मार्केटमधून ताज्या मासळीचे एकूण १० नमुने घेतले. या सर्व मासळीची अन्न आणि औषध प्रशासनाच्या बांबोळी प्रयोगशाळेत चाचणी घेण्यात आली. पण दहाही नमुन्यांत कुठल्याच प्रकारचे रसायन, रंग किंवा हानिकारक मिश्रण चाचणीत आढळून आलेले नाही.