खाण घोटाळा : इम्रान खानला कोठडी

14th September 2017, 02:44 Hrs
प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने बेकायदेशीर खाण प्रकरणी मंगळवारी अटक केलेला संशयित इम्रान खान याला येथील विशेष न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी ठोठावली आहे. तर खानने दाखल केलेल्या जामीन अर्जाची सुनावणी गुरुवारपर्यंत (दि. १४) तहकूब केली आहे.
विशेष तपास पथकाने संशयित इम्रान खानने अमेलिया फिगेर्डो याच्या नावावर असलेल्या सर्व्हे क्रमांक टीसी ६५/५१ या मालमत्तेची पाॅवर अाॅफ अॅटर्नी मिळवली आणि त्याने आपल्या नावावर पर्यावरण दाखला मिळवून २००७ ते
२०१२ साली खाण व्यवसाय सुरू करून कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर उत्खनन केले असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
या प्रकरणी विशेष न्यायालयात जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी सरकारी वकील जी. डी. किर्तनी यांनी आक्षेप घेऊन संशयिताने बनावट पर्यावरण दाखल्याच्या आधाराने फसवणूक करून २००७ ते २०१२ पर्यंत सुमारे ९ लाख मेट्रिक टनाचे खनिज वाहतूक केल्याची माहिती खाण खात्यात असून, संबंधित खनिज त्याने सर्व्हे क्रमांक टीसी ६५/५१ या मालमत्तेतून उत्खनन केल्याचा दावा केला आहे. तसेच संशयिताने केलेल्या व्यवहाराचे दस्तावेज जप्त करून मुळापर्यंत जाण्यासाठी त्याला कोठडी देण्याची आवश्‍यकता अाहे. संशयिताची जामिनावर सुटका केल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकेल, असा युक्तिवादही सरकारी वकील किर्तनी यांनी केला.
आपल्या अशिलावर दाखल करण्यात आलेले कलम हे अजामीनपात्र अाहे, तसेच आपला अशील हा वाहतूकदार आहे. संशयित सरकारी अधिकारी नसून, त्याच्यावर दाखल केलेले कलम लागू होत नाही, असा युक्तिवाद संशयितातर्फे अॅड. नितीन सरदेसाई यांनी केला आहे.
नावाचा गैरवापर : दिगंबर कामत
माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी संशयित इम्रान खान या प्रकरणात आपली बदनामी करण्यासाठी आपल्या नावाचा गैरवापर करीत आहे, असा आक्षेप घेतला. संशयित खान याचा आणि आपला काहीच संबंध नसल्याचा दावा कामत यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

Related news

पेडणेत कार्निव्हल सर्वधर्मसमभाव संस्कृती राखण्यासाठी

मंत्री आजगावकर यांचे प्रतिपादन : राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून कार्निव्हल विरोधी घोषणा Read more

प्रगत शेती - समृद्ध शेतकरी उद्दिष्ट अपूर्णच

सरकारकडून विशेष प्रयत्न : युवकांची नकारात्मक मानसिकता Read more

Top News

कॉर्पोरेशन बँकेला ३१ लाखांचा गंडा

बनावट सोने तारण ठेवून घेतले कर्ज, दाम्पत्यासह सोनाराविरोधात गुन्हा दाखल Read more

त्या उपनिरीक्षकाची बदली

वेर्णा पोलिस स्थानकातून राखीव दलात रवानगी Read more

अर्शलाला न्याय द्या

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची कुटुंबियांची मागणी Read more

म्हापशात वाहतूक पोलिसाला ठोकरले

बांबोळी येथे दाखल, इको कारचालकाला अटक Read more